विराट कोहलीमध्ये चीड, राग, जिद्द, विनम्रता, मदत करण्याची वृत्ती, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची जिगर असे सगळे गुण एकवटले आहेत
क्रिकेटपटू सहसा आपली बॅट कुणालाच देत नाहीत. त्यांचा जीव जणू त्या बॅटमध्ये असतो. विराटनं मात्र आपल्या बॅट होतकरू फलंदाजांना दिलेल्या मी पाहिल्या आहेत. एखाद्याची कामगिरी आवडली, त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, असं विराटला वाटलं की, आपली बॅट विराट त्या खेळाडूला बक्षीस, भेट म्हणून देतो. बॅगा, कपडे हे तर तो सातत्याने भेट देत असतो. संघ आणि संघातील सहकारी यांच्या हक्कासाठी तो बीसीसीआयशीदेखील झगडायला मागेपुढे बघत नाही.......